पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्ष मतदारसंघांचा आढावा घेत उमेदवारांची चाचपणी करत आहेत. महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार मतदासंघ निहाय चाचपणी करण्यात येत आहे. तसेच भाजपकडून उमेदवारांच्या निवडण्यासाठी मतदारसंघातील पदाधिकार्यांचे मतदान घेण्यात आले. आज ही प्रक्रिया पुण्यात पार पडली.
उमेदवार निवडीसाठी घेतलेल्या मतदान प्रक्रियेतून कोथरुड, शिवाजीनगर, पर्वती आणि खडकवासला या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांंनी विद्यमान आमदारांनाच पसंती देण्यात आल्याचे समोर आले. मात्र, शहरातील सर्वात चर्चेत असणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघातून धीरज घाटे, हेमंत रासने आणि कुणाल टिळक यांची नावे आघाडीवर आहेत.
कसबा मतदारसंघात हेमंत रासने हे जोमाने तयारी करताना दिसत आहेत. मतदारसंघातील नागरिकांशी अनेक विषयांवर चर्चा करुन त्यांच्या समस्या सोडवणे, महिलांचा सन्मान करणारे छोटे-मोठे उपक्रम राबवणे, रिक्षा चालकांसाठी गणवेश वाटप करणे असे शेकडो उपक्रम राबवत रासने मतदारांमध्ये काम करत असून त्यांनी आपले स्थान निर्माण केल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपकडून हेमंत रासने यांचे नाव कसब्यातून पुढे येण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून विद्यमान आमदार सुनील कांबळे आणि त्यांचे बंधू दिलीप कांबळे यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच वडगाव शेरी आणि हडपसरच्या जागांसाठी अद्याप विचार करण्यात आला नव्हता मात्र, दुसऱ्या टप्प्यामध्ये या मतदारसंघांसाठी मतदान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काकांचा पुतण्याला आणखी एक मोठा धक्का; विलास लांडेंचं तुतारी फुंकणं फिक्स, कोणी केली घोषणा?
-‘आमचं आयुष्य उद्ध्वस्त करुन ते…’; सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कोणाकडे?
-पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय
-पंतप्रधान मोदींची सभा नाही, पण मैदानाची चांगलीच दुरावस्था झाली