पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. जशी निवडणूक जवळ येत आहे तसा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात चांगलेच इनकमिंग सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांना अनेक मतदारसंघातून धक्का देण्यासाठी शरद पवारांनी आपली राजकीय खेळी खेळण्यास सुरवातही केली आहे. अनेक मतदारसंघात काकांनी पुतण्याला धक्का दिला आहे. त्यातच आता अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाचे माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवारांच्या पुण्यातील निवसस्थानी (मोदी बागेत) शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर लांडे हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुकणार असल्याची चर्चा रंगली. याच चर्चेवर आता विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी शिक्कामोर्तब केल्याचं पहायला मिळतंय.
विक्रांत लांडे यांनी विलास लांडे विधानसभेला तुतारी फुंकणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळणार नसल्याचं लक्षात येताच विलास लांडे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरली असल्याचं पहायला मिळत आहे. याबाबत विलास लांडे यांचे पुत्र विक्रांत लांडे यांनी घोषणा केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आमचं आयुष्य उद्ध्वस्त करुन ते…’; सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कोणाकडे?
-पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय
-पंतप्रधान मोदींची सभा नाही, पण मैदानाची चांगलीच दुरावस्था झाली
-ओबीसी-मराठा कार्यकर्त्यांचा ससून रुग्णालयात राडा; २०-२५ मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल