पुणे : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वारंवार एकमेकांच्या समोर येत असल्याचे चित्र असून सोमवारी मध्यरात्री पुण्यातील ससून रुग्णालयासमोर मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातल्याचे समोर आले. कोंढवा परिसरामध्ये सोमवारी रात्री ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यपान केल्याचे आढळले असा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर हाकेंनी मद्यपान केले की नाही याची चाचणी करण्यासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मराठा आणि ओबीसी समाजाचे कार्यकर्ते रुग्णालयासमोरच आमने सामने आले होते.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांकडून पोलिसांना परस्पर तक्रारी देण्यात आल्या होत्या. लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरून २० ते २५ मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा पूर्वनियोजित गट असून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा दावा हाकेंनी केला आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारूच्या नशेत मराठा कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. ‘सुरुवातीला जुजबी संवाद साधला. नंतर खाली उतरताच पाच ते सहा चार चाकी येऊन मला पकडले. हात आणि मान पकडत मला जिवे मारण्याचा प्रयत्न’ केल्याचा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ससून रुग्णालयाकडून लक्ष्मण हाके यांना क्लीनचिट मिळाली. लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
महत्वाच्या बातम्या-
-जुन्नरमध्ये ठरलं! राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार
-‘त्यांच्यासोबत जात मतदान केलं तर तुम्हाला सौ..’; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
-शरद पवारांच्या बैठकानंतर संभाव्य बंड टाळण्यासाठी अजितदादा घेणार कार्यकर्त्यांची शाळा
-भोसरीमध्ये आघाडीत वादाची शक्यता; ठाकरेंचा नेता पवारांच्या भेटीला