पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक पक्षाकडून मतदारसंघांची चाचपणी सुरु आहे. जागावाटपावरुन महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अंतर्गत कलह पहायला मिळत आहे. अशातच आता जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अतुल बेनके हे येथील विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले आहेत. राष्ट्रवादी फूटीनंतर अतुल बेनके यांनी अजित पवारांसोबत गेले. मात्र, त्यानंतर लाेकसभेच्या निवडणुकीमध्ये जुन्नरमधून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार डाॅ. अमाेल काेल्हे यांनी जुन्नरमधून ५१, ३९३ मतांचे लीड मिळविले हाेते. अतुल बेनके यांनी अजित पवारांचा हात पकडल्याने शरद पवारांनी येथून आपला उमेदवार निश्चित केला आहे.
जुन्नरमध्ये शरद पवारांनी गेल्या तीन महिन्यांत तीन वेळा भेटी दिल्या. सत्यशील शेरकर यांना ताकद देणे सुरू केले आहे. एकीकडे शरद पवारांचा आशिर्वाद आणि दुसराकडे अमाेल काेल्हे यांची साथ यामुळे शेरकर यांच्यासाठी फायद्याचं ठरु शकतं. मात्र, डाॅ. काेल्हे यांचा हा तालुका असल्याने त्यांची देखील प्रतिष्ठा येथे पणाला लागणार आहे.
अजित पवार महायुतीत सामील झाल्याने सगळी समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे शरद साेनवणे आणि आशा बुचके बंडखाेरी करण्याची शक्यता वर्तविली जातेय. दाेघांचीही मतदारसंघात सवत:ची मते आहेत. त्यामुळे त्यांची बंडखाेरी अतुल बेनके यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. अतुल बेनके आणि सत्यशील शेरकर यांच्यातच लढत हाेऊ शकते. म्हणजे राष्ट्रवादी विरुध्द राष्ट्रवादी हा सामना जुन्नर विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकतो.
महत्वाच्या बातम्या-
-‘त्यांच्यासोबत जात मतदान केलं तर तुम्हाला सौ..’; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
-शरद पवारांच्या बैठकानंतर संभाव्य बंड टाळण्यासाठी अजितदादा घेणार कार्यकर्त्यांची शाळा
-भोसरीमध्ये आघाडीत वादाची शक्यता; ठाकरेंचा नेता पवारांच्या भेटीला
-पुण्यात नेमकं काय सुरुय? भारती विद्यापीठ परिसरात ५६ लाखांची अफू जप्त