पुणे : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या गेल्या काही दिवसांपासून निधी वाटपावरुन तुफान खडाजंगी सुरु आहे. निधी वाटप करताना, अनुदान देताना आणि भूखंड वाटप करताना सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांना त्याचा फायदा करुन दिला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. या सर्व विषयावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“सरकारसोबत जनमत नाही. त्यामुळे ते सध्या काही नेत्यांवर मेहरबान आहेत. काही दिवसापासून अर्थ मंत्रालयाने केलेला विरोधाला डावलून निर्णय घेतले जात आहेत. मुंबई, पुणे, नागपूर येथील भूखंड असतील सूतगिरण्यांना अथवा कारखान्यांना निधी मंजूर करणे अशा गोष्टी सरकार काही ठराविक लोकांसाठी करीत आहे. जर तुम्ही त्यांच्यासोबत गेलात त्यांना मतदान केलं तर तुम्हाला ‘सौ खून माफ’ आहेत. मात्र तुम्ही विरोधात असाल तर तुम्हाला काहीच मिळणार नाही अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुंतवणूकदारांना वेळेत पैसे मिळणार नाहीत, कारण लाडक्या बहीण योजनेसाठी निधी दिला जातो. नितीन गडकरी हे ज्या पक्षाचे नेते आहेत त्याचं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे. त्यामुळे ते राज्याच्या आर्थिक परिस्थिती बाबत अधिक योग्य प्रकारे सांगू शकतात. गडकरी यांच्याबरोबरच राज ठाकरे आणि काही इकॉनॉमिक्स देखील राज्यातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे सांगत आहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे,”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांच्या बैठकानंतर संभाव्य बंड टाळण्यासाठी अजितदादा घेणार कार्यकर्त्यांची शाळा
-भोसरीमध्ये आघाडीत वादाची शक्यता; ठाकरेंचा नेता पवारांच्या भेटीला
-पुण्यात नेमकं काय सुरुय? भारती विद्यापीठ परिसरात ५६ लाखांची अफू जप्त
-हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त टळणार? राष्ट्रवादीची ‘तुतारी’ फुंकण्याला कार्यकर्त्यांचा विरोध