पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठका सुरु आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी काका शरद पवारांनी राज्यात खेळी खेळायला सुरवात केली आहे. अजित पवारांनी देखील आता पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे.
शरद पवारांनी पुणे जिल्ह्यातील १२ मतदारसंघामध्ये फिल्डींग लावली आहे. अशातच आता शरद पवारांचा पुण्यातील चक्रव्यूह तोडण्यासाठी अजित पवार सरसावले आहेत. उद्या मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व आजी-माजी आमदार नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना मेळाव्याचा निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांना देखील उपस्थित राहण्याच्या आदेश अजित पवारांनी दिला आहे. शरद पवारांच्या बैठकानंतर संभाव्य बंड टाळण्यासाठी अजित पवार कार्यकर्त्यांची शाळा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भोसरीमध्ये आघाडीत वादाची शक्यता; ठाकरेंचा नेता पवारांच्या भेटीला
-पुण्यात नेमकं काय सुरुय? भारती विद्यापीठ परिसरात ५६ लाखांची अफू जप्त
-हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त टळणार? राष्ट्रवादीची ‘तुतारी’ फुंकण्याला कार्यकर्त्यांचा विरोध
-मावळात ‘महाआरोग्य’ शिबिराला उदंड प्रतिसाद! आमदार शेळकेंच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक