पुणे : पुणे शहरामध्ये ड्रग्ज, अफू, गांजा विक्री सुरु असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यातच आता भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव भागामध्ये अफूची विक्री सुरु असल्याचे समोर आले आहे. अफू विक्री करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून तब्बल ५६ लाख ९० हजार रुपयांची दोन किलो ८४५ ग्रॅम अफू जप्त करण्यात आला आहे.
आंबेगाव भागात राहणाऱ्या देवीलाल शंकरलाल अहिर (वय, ४२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ परिसरातील आंबेगाव भागात एक जण अफू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी योगेश मांढरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून पोलिसांनी देवीलाल अहिरला ताब्यात घेतला. पोलिसांनी त्याची चौकशी केली.
देवीदास अहिर हा दुचाकीवरुन जात असताना त्याच्या दुचाकीची डिक्की उघडल्यानंतर त्यात अफू सापडली. पोलिसांच्या पथकाने अफू, दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त केला आहे. अहिरने अफू कोठून आणली, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त टळणार? राष्ट्रवादीची ‘तुतारी’ फुंकण्याला कार्यकर्त्यांचा विरोध
-मावळात ‘महाआरोग्य’ शिबिराला उदंड प्रतिसाद! आमदार शेळकेंच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक
-हर्षवर्धन पाटलांचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी घेणार मोठा निर्णय
-‘राजगडला अडचणीत आणणाऱ्यांचा बंदोबस्त’; संग्राम थोपटेंचा रोख नेमका कोणाकडे?
-‘लाडकी बहिण, लाडकी लेक योजना राबवता, पण…’; शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड