पुणे : जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसा राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येत आहे. महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणाऱ्या विधानसभा मतदारसंघापैकी असलेल्या इंदापूर मतदारसंघामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र आता खुद्द हर्षवर्धन पाटलांनी प्रतिक्रिया दिली असून आता वेगळा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
‘लोकांचा आग्रह आहे की मी इंदापूरमधून निवडणूक लढवली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ असल्याने त्यांच्या मताचा विचार करावा, असा आग्रह असल्याचे ते म्हणालेत. त्यामुळे निवडणूक लढवण्याच्या संदर्भात मतदारसंघातून कार्यकर्त्यांचे प्रचंड प्रेशर असून त्या संदर्भात मला पितृ पंधरवडा झाल्यानंतर निर्णय घ्यावाच लागेल’, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत.
मला यावेळी सर्वच सर्व बाबतीत विचार करावा लागेल. त्याचबरोबर लोकांचं जे म्हणणं आहे त्याचा सुद्धा गंभीरपणे विचार करावा लागेल. आजपर्यंत इंदापूर मतदारसंघाची वाटचाल ही लोकशाहीच्या मार्गाने झाले आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये हा कार्यकर्त्यांना अधिकार आहे’, असे हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांकडून व्हायरल होत असलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘राजगडला अडचणीत आणणाऱ्यांचा बंदोबस्त’; संग्राम थोपटेंचा रोख नेमका कोणाकडे?
-‘लाडकी बहिण, लाडकी लेक योजना राबवता, पण…’; शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड
-पुणे महापालिकेच्या निधी वाटपातही ‘लाडकी पदाधिकारी योजना?’ महायुतीत खडाखडी
-पुण्यात शरद पवारांचं टार्गेट सेट; दादा समर्थक आमदाराची काढली विकेट; म्हणाले, तू कोणाच्या पक्षातून…
-ऐकावं ते नवलंच! रोख रकमेसह चोरट्यांनी आंबा बर्फीवरही मारला डल्ला