पुणे : पुण्यातील खराडी भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा महानिर्धार मेळावा झाला. यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसेच राज्य सरकारच्या लाडकी बहिण लाडकी लेक अशा योजनांवरुन सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे.
‘लाडकी बहीण, लाडकी लेक अशा योजना राबवून पैसे द्यायचे. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करायच्या नाहीत, असा कारभार राज्य सरकारचा आहे. महिला, मुलींवर दररोज अत्याचाराच्या घटना घडत असताना सत्ताधारी पक्ष योजनांचा पैसा देण्यामध्ये अडकले आहे,’ अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.
‘लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी ४०० पारचा नारा देऊन देशाचे संविधान बदलण्याचा निर्धार करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही महाविकास आघाडी स्थापन केली. देशाच्या संविधानाला मानणारे अनेक छोटे-मोठे पक्ष महाविकास आघाडीत सहभागी झाले. मतदारांनाही संविधान बदलण्याचा निर्णय मंजूर नसल्याने नागरिकांची साथ मिळाली आणि राज्यात ४८ पैकी ३१ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. महाराष्ट्रात सत्ताधारी असलेल्या राज्यकर्त्यांनीदेखील गेल्या पाच वर्षांत विकासाची कामे केलेली नाहीत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवून द्या,’ असे आवाहन शरद पवार यांनी खरडीमध्ये बोलताना केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे महापालिकेच्या निधी वाटपातही ‘लाडकी पदाधिकारी योजना?’ महायुतीत खडाखडी
-पुण्यात शरद पवारांचं टार्गेट सेट; दादा समर्थक आमदाराची काढली विकेट; म्हणाले, तू कोणाच्या पक्षातून…
-ऐकावं ते नवलंच! रोख रकमेसह चोरट्यांनी आंबा बर्फीवरही मारला डल्ला
-पावसाने घातला खोडा आता नव्याने ठरला मुहूर्त, नेमकं कधी होणार मेट्रोचे उद्घाटन; मोहोळ म्हणाले…
-अग्रवालांच्या ‘बाळा’ला दिल्लीच्या कॉलेजात नाकारला प्रवेश; पोर्शे अपघात प्रकरणामुळे अडचणीत