पुणे : जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटप करताना पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून भेदभाव होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या ३ आमदारांनी नुकतेच आंदोलन केले. ‘विकास कामांनी मिळणारा निधी हा आमच्या हक्काचा असून अशा प्रकारचा भेदभाव करणे हे चुकीचं आहे’, असा आरोप या आमदारांनी केला होता. तसेच ‘यापूर्वीच्या कोणत्याही पालकमंत्र्यांनी असं केलं नव्हतं’, असा आरोप देखील यावेळी काँग्रेस आमदार संग्राम थोटे यांनी केला होता.
गेल्या काही दिवसांपासून निधी वाटपामध्ये होत असलेल्या भेदभावाबाबत नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये सत्ताधाऱ्यांना एक आणि विरोधकांना एक न्याय दिला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नुकताच केला होता. आता पुणे शहराच्या पूर्व भागातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला विकास कामांसाठी २० ते २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा समोर आला आहे. त्यामुळे अजित पवार गटासह भाजपमधील माजी नगरसेवक नाराज झाले आहेत.
अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले अन् पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यास भाजपच्या लोकांना निधी मिळणार नाही अशी भीती त्यावेळेस स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांनी व्यक्त केली होती. आता ती भीती खरी होत आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची देखील निधी मिळवताना दमछाक होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याने भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचा सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात शरद पवारांचं टार्गेट सेट; दादा समर्थक आमदाराची काढली विकेट; म्हणाले, तू कोणाच्या पक्षातून…
-ऐकावं ते नवलंच! रोख रकमेसह चोरट्यांनी आंबा बर्फीवरही मारला डल्ला
-पावसाने घातला खोडा आता नव्याने ठरला मुहूर्त, नेमकं कधी होणार मेट्रोचे उद्घाटन; मोहोळ म्हणाले…
-अग्रवालांच्या ‘बाळा’ला दिल्लीच्या कॉलेजात नाकारला प्रवेश; पोर्शे अपघात प्रकरणामुळे अडचणीत
-‘जोपर्यंत मेट्रो सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही…’; पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आंदोलन