पुणे : पुणे शहारमधील येरवडा परिसरातील एका मिठाईच्या दुकानात चोरट्यांनी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी मिठाईच्या दुकानातील रोख रक्कम लंपास केली आहे. विषेश म्हणजे या चोरट्यांनी आंबा बर्फी देखील चोरून नेली आहे. चोरट्यांनी रोख रकमेसह अडीच किलो आंबा बर्फी चोरून नेल्याची घटना येरवडा भागात घडली.
मिठाई विक्रेते सैतानसिंग सवाईसिंग देवडा (वय ४८, रा. एकता हाऊसिंग सोसायटी, गोल्फ क्लब रस्ता, येरवडा) यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देवडा यांचे गोल्फ क्लब रस्त्यावर नारायण स्वीट मार्ट मिठाई विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. दुकानात प्रवेश करुन चोरट्यांनी गल्ला उचकटून गल्ल्यातील ८ हजार ७०० रुपये आणि अडीच किलो आंबा बर्फी चोरुन चोरटे पसार झाले.
गुरुवारी सकाळी देवडा दुकान उघडण्यासाठी आले. तेव्हा दुकानाचे कुलूप उचकटल्याचे लक्षात आले. गल्ल्यातील रोकड आणि बर्फी चोरल्याचे लक्षात आल्यानंतर देवडा यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस नाईक मदने तपास करत आहेत. शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पावसाने घातला खोडा आता नव्याने ठरला मुहूर्त, नेमकं कधी होणार मेट्रोचे उद्घाटन; मोहोळ म्हणाले…
-अग्रवालांच्या ‘बाळा’ला दिल्लीच्या कॉलेजात नाकारला प्रवेश; पोर्शे अपघात प्रकरणामुळे अडचणीत
-‘जोपर्यंत मेट्रो सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही…’; पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आंदोलन
-‘पुढच्या २४ तासात मेट्रो सुरु केली नाही तर…’; महाविकास आघाडीचा इशारा