पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे रोजी एक अपघात झाला. या अपघाताचे पडसाद फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यभर उमटले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा अल्पवयीन आणि ‘बडे बाप का लाडला’ आहे. प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन लाडोबाने मद्यधुंद अवस्थेत अलिशान कारने भरधाव वेगात २ तरुणांना चिरडलं. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणामध्ये अनेक नवनविन खुलासे होत असून अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर आता या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला आता ‘बीबीए’ अभ्यासक्रमासाठी दिल्लीतील एका शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे. मात्र, आता त्याला या संस्थेने प्रवेश देण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, आता कल्याणीनगरमध्ये घडलेल्या भीषण घटनेनंतर त्याला कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. तर मुलाचे शिक्षण बाधित होऊ नये, अशी मागणी त्याच्या वकिलांनी काल( गुरुवारी) बाल न्याय मंडळाकडे केली आहे. त्यावर या मुलाच्या शिक्षणासाठी कोणतीही आडकाठी होऊ नये, अशी भूमिका विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मांडली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘जोपर्यंत मेट्रो सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही…’; पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आंदोलन
-‘पुढच्या २४ तासात मेट्रो सुरु केली नाही तर…’; महाविकास आघाडीचा इशारा
-पुणेकरांनो सावधान! शहराला मुसळधार पावसाचा इशारा
-गावात स्मशानभूमी नाही, तर मतदान नाही; हवेली तालुक्यातील ‘या’ गावकऱ्यांची आक्रमक भूमिका
-पंतप्रधान मोदींचा ‘ती’ खास पगडी घालून होणार होता सन्मान, पण….