पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोच्या लोकार्पणासाठी पुण्यात येणार होते. मात्र, पावसामुळे मोदींचा दौरा रद्द करण्यात आला. मोदींच्या पुणे दौऱ्यासाठी शहरातील भाजपकडून जोरात तयारी करण्यात आली होती. त्यानंतर विरोधकांनी दौरा रद्द झाला म्हणून सत्ताधारी नेत्यावर हल्लाबोल केला, त्याचबरोबर मेट्रोचे काम होऊन अनेक दिवस झाले मात्र, लोकार्पणसाठी ती सामान्यांसाठी खुली केली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
या मेट्रो मार्गिकेच्या लोकार्पणाता सोहळा पुढे ढकलला असून रविवारी २९ तारखेला हा कार्यक्रम होणार आहे. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना आक्रमक भूमिका घेतली असून शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय येथील मेट्रो स्थानक येथे आंदोलन सुरु केले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लाल फित कापत त्यांनी लोकार्पण केले असून आजच आम्ही मेट्रोने प्रवास करणार असल्याचे म्हणत आक्रमक झाले आहेत.
काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन सुरू झाले आहे. ‘मोदींच्या येण्याची वाट पाहण्याची गरज नाही. सामान्यांचे पैसे आहे. त्यांचा अपव्यय होत आहे. काल मोदींनी मेट्रोचे ऑनलाईन पध्दतीने का लोकार्पण केले नाही’, असा संतप्त सवाल नेत्यांनी उपस्थित केला आहे. ‘जोपर्यंत मेट्रो सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही इकडून हलणार नाही, असेही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले आहे.
काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर, शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, ठाकरे गटाचे शहर अध्यक्ष संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. तसेच यावेळी सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. आंदोलनांच्या ठिकाणी कोणताही अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुढच्या २४ तासात मेट्रो सुरु केली नाही तर…’; महाविकास आघाडीचा इशारा
-पुणेकरांनो सावधान! शहराला मुसळधार पावसाचा इशारा
-गावात स्मशानभूमी नाही, तर मतदान नाही; हवेली तालुक्यातील ‘या’ गावकऱ्यांची आक्रमक भूमिका
-पंतप्रधान मोदींचा ‘ती’ खास पगडी घालून होणार होता सन्मान, पण….
-मोदींचा दौरा रद्द; मविआ आक्रमक, उद्याच करणार मेट्रोचं उद्घाटन