पुणे : पुणे शहरात मेट्रोचे जाळे दिवसेंदिवस पसरत असून मेट्रोच्या नव्या स्वारगेट ते शिवाजीनगर न्यायालय मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येणार होते. भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. ऐनवेळी पुण्यात अतिपावसामुळे मोदींचा दौरा रद्द करण्यात आला असून या उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. त्यातच आता नागरिकांना या मेट्रो सेवेची वाट पहावी लागणार आहे. यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.
‘पावसाचे कारण देऊन पंतप्रधानांनी लोकार्पण सोहळा पुढे ढकलला आहे. जनतेच्या पैशातून निर्माण झालेली मेट्रो मार्गिका कोणा एका व्यक्तीच्या हट्टापायी वापराविना पडून राहणे योग्य नाही. म्हणूनच उद्यापर्यंत ही मार्गिका सुरू न केल्यास महाविकास आघाडीच्या वतीने मार्गिकेचे उद्घाटन केले जाईल’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
‘उद्या महाविकास आघाडीचे सर्व नेतेमंडळी एकत्रित येऊन या मेट्रोमार्गीकेचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळे याची दखल घेऊन पुढील २४ तासात ही मेट्रोमार्गीका सुरू करावी. अन्यथा महाविकास आघाडी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे’, असा इशारा जगताप यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांनो सावधान! शहराला मुसळधार पावसाचा इशारा
-गावात स्मशानभूमी नाही, तर मतदान नाही; हवेली तालुक्यातील ‘या’ गावकऱ्यांची आक्रमक भूमिका
-पंतप्रधान मोदींचा ‘ती’ खास पगडी घालून होणार होता सन्मान, पण….
-मोदींचा दौरा रद्द; मविआ आक्रमक, उद्याच करणार मेट्रोचं उद्घाटन
-मोदींचा दौरा रद्द, पण अजितदादांनी पहाटेच केली मेट्रोच्या कामाची पाहणी