पुणे : पुणे शहरामध्ये मेट्रोचं जाळं चांगलंच पसरत आहे. येत्या २७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शहरातील भाजपच्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांनी मोदींच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. नरेंद्र मोदी यांची पुण्यातील स.प. महाविद्यालय (S.P.) मैदानावर सभा होणार आहे.
येत्या शुक्रवारी पुण्यातून भाजप विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शनही करण्यात येणार आहे. पुण्यात नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजपचे दिग्गज नेते हजर राहणार आहेत. यादरम्यान इच्छुकांनी पुण्यातील अनेक रस्त्यांवर नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अनेक बॅनर लावले आहेत.
दरम्यान, कसब्यातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष धीरज घाटे, पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, पर्वतीतून इच्छुक असणारे श्रीनाथ भिमाले या सर्वांनी मोदींच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी पुणे भाजपकडून जय्यत तयारी केली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग सोय करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना गर्दी जमवण्याचे टार्गेट दिले असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वडगाव शेरीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा कायम; महाविकास आघाडीत रस्सीखेच
-वाहतूक कोंडीची हद्द झाली! प्रवाशी नाश्ता करुन आले तरी गाड्या जागच्या हलल्या सुद्धा नाहीत
-महात्मा फुलेंच्या विचारांचा मोदींकडून अपमान; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका
-शिंदेंच्या शिलेदाराचा नारा, ‘हडपसर शिवसेनेलाच’; अजितदादांच्या आमदाराची डोकेदुखी वाढली