पुणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 च्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीद्वारे या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. जागावाटपांवरुन वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. यादरम्यान पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आग्रही असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. आता शिवसेनेच्या फायरब्रँड महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी या अफवांवर शिक्कामोर्तब केला आहे.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘शिवसेनेने पुण्यातील 3 जागा मागितल्या आहेत. हडपसर, कोथरूड आणि वडगाव शेरी या तीनही जागा आम्ही लढणार. या जागांवरील दावा शिवसेनेने सोडलेला नाही. महाविकास आघाडीतील नेते वरिष्ठ पातळीवर बसून त्याबाबत चर्चा करतील. परंतु मी पुणेकर म्हणून खासकरुन वडगाव शेरीतील रहिवासी म्हणून माझ्या भागात माझ्या पक्षाचं काय अस्तित्व आहे. आम्ही ती जागा मागावी की नाही, याचा मला मागितलेला अहवाल मी पाठवला आहे. त्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईलट, असे सुषमा अंधारेंनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुण्यातील ८ पैकी ३ जागांवर शिवसेनेने केलेल्या या दाव्यावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये शिवसेनेला पुण्यातील किती जागा मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वाहतूक कोंडीची हद्द झाली! प्रवाशी नाश्ता करुन आले तरी गाड्या जागच्या हलल्या सुद्धा नाहीत
-महात्मा फुलेंच्या विचारांचा मोदींकडून अपमान; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका
-शिंदेंच्या शिलेदाराचा नारा, ‘हडपसर शिवसेनेलाच’; अजितदादांच्या आमदाराची डोकेदुखी वाढली
-पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव ठरलं! केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले…