पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून मोशी येथे आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामाला सुरूवात करण्यात येणार आहे.
भाजप आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडला स्पोर्ट्स हब बनवण्याचा संकल्प केला होता. त्याअनुशंगाने विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय क्रीडा संकूल उभारण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्याला यश मिळाले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मौजे मोशी येथे गट क्र. ४४२ पै. व गट क्र. ४४५ पै मध्ये मंजूर विकास आराखड्यातील आरक्षण क्र. १/२०४ मध्ये स्टेडिअमचे प्रयोजन आहे. सदर ठिकाणी बहुउद्देशीय क्रिडा संकुल उभारण्याबाबत महापालिका सभा क्र. ३९१ मध्ये दि. २५ जुलै २०२३ रोजी मंजूर करण्यात आला होता. प्रस्तावित ठिकाणी ४.५६ हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड आरक्षित आहे. त्या ठिकाणी स्टेडिअम होणार आहे.
मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील एक भूखंड महाराष्ट्र क्रिकेट असोशिएन (MCA) मार्फत विकसित करुन चांगल्या प्रकारचा स्पोर्ट्स क्लब शहराला उपलब्ध झाला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्ये इंटरनॅशनल मल्टीपर्पज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विकसित होणार आहे.
या कॉम्प्लेक्समध्ये क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बेसबॉल व जलतरण इत्यादी खेळासाठी व खेळाडुंना चालना मिळणार आहे. तसेच, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस कायमस्वरुपी मिळकतकर उपलब्ध होणार आहे. सदर प्रकल्प ‘‘बांधा, अर्थपुरवठा करा, चालवा आणि हस्तांतर करा’’ तत्त्वावर सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे (PPP) उभारण्यात येणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा या प्रकल्पावर खर्च होणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
-वाहतूक कोंडीची हद्द झाली! प्रवाशी नाश्ता करुन आले तरी गाड्या जागच्या हलल्या सुद्धा नाहीत
-महात्मा फुलेंच्या विचारांचा मोदींकडून अपमान; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका
-शिंदेंच्या शिलेदाराचा नारा, ‘हडपसर शिवसेनेलाच’; अजितदादांच्या आमदाराची डोकेदुखी वाढली
-पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव ठरलं! केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले…
-‘फार्महाऊस’ वर मटन पार्ट्यां द्यायच्या, हा काय बिहार आहे का? शिवसेनेची वाघीण कडाडली