पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न वाढतच आहे. हा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुण्यात अनेक भागात पुणे मेट्रो सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, काही भागामध्ये मेट्रोचे काम अद्यापही सुरु आहे. या मेट्रोच्या कामामुळे आणखीणच वाहतूक कोंडी होत असून पुणेकर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरामध्ये वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. विद्यापीठ चौकामध्ये आज सकाळी ६ वाजल्यापासून चांगलीच वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. विद्यापीठाच्या मेन गेटसमोर मेट्रोच्या कामासाठी एक कमानी बांधली आहे. या कमानीवरील जाळीमध्ये लोखंडी साहित्य पडल्याने ही जाळी रस्त्यावर आली होती. त्यामुळे विद्यापीठ चौकापासून ते शिवाजीनगर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
या परिसरात झालेली वाहतूक कोंडी इतकी भयंकर होती की एका पीएमपी बसमधील प्रवाशी बाजूच्याच हॉटेल्समधून नाश्ता करुन पुन्हा बसमध्ये येऊन बसले मात्र, बस जागची हालली सुद्धा नाही. या परिस्थीतीवर बसमधील प्रवाश्यांसह इतर दुचाकी, चारचाकी वाहन चालकही चांगलेच संतापलेले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-महात्मा फुलेंच्या विचारांचा मोदींकडून अपमान; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका
-शिंदेंच्या शिलेदाराचा नारा, ‘हडपसर शिवसेनेलाच’; अजितदादांच्या आमदाराची डोकेदुखी वाढली
-पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव ठरलं! केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले…
-‘फार्महाऊस’ वर मटन पार्ट्यां द्यायच्या, हा काय बिहार आहे का? शिवसेनेची वाघीण कडाडली
-पालिकेचा ट्रक पडलेल्या खड्ड्याचा ऐतिहासिक संदर्भ लागला; काय आहे नेमकं कारण?