पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २७ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते भिडे वाड्याचे भूमीपूजन होणार आहे. यावर आता पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्षेप घेतला असून आक्रमक भूमिका घेतली आहे. “भिडे वाड्याचे काम हे सरकारच्या प्रयत्नांनी नव्हे तर कोर्टाच्या आदेशाने सुरू झाले आहे. ज्यात आपलं कर्तुत्व नाही त्या गोष्टींचे श्रेय घेण्याची नरेंद्र मोदींची धडपड केविलवाणी आहे”, अशा शब्दांत प्रशांत जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचा विरोध व्यक्त केला आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे सत्यशोधक विचारांचे होते, कर्मकांड त्यांना मंजूर नव्हते. हे सत्य संपूर्ण जगाला माहिती असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनाच्या निमित्ताने भिडे वाड्यात कर्मकांड करण्याचा घाट घातला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला अनुसरून पंतप्रधान मोदी हे महात्मा फुलेंच्या विचारांचा अपमान करत आहेत हे अत्यंत निंदनीय आहे, असेही प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
‘नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यात यापूर्वीच मेट्रोच्या विविध मार्गीकांचे लोकार्पण झाले आहे. प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात यायचं व मेट्रोच्या छोट्याशा टप्प्याचा उद्घाटन करायचं ही नरेंद्र मोदींची शैली पुणे शहरात विनोदाचा विषय झाली आहे. किंवा निवडणुका जिंकण्यासाठी सुरू असलेल्या या माकडचेष्टा आम्ही पुणेकरांसमोर उघड करू’, असा इशाराही प्रशांत जगताप यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिंदेंच्या शिलेदाराचा नारा, ‘हडपसर शिवसेनेलाच’; अजितदादांच्या आमदाराची डोकेदुखी वाढली
-पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव ठरलं! केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले…
-‘फार्महाऊस’ वर मटन पार्ट्यां द्यायच्या, हा काय बिहार आहे का? शिवसेनेची वाघीण कडाडली
-पालिकेचा ट्रक पडलेल्या खड्ड्याचा ऐतिहासिक संदर्भ लागला; काय आहे नेमकं कारण?
-पिंपरी, चिंचवड मतदारसंघावरुन महायुतीत मिठाचा खडा; काय असणार राजकीय गणितं?