पुणे : विधानसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. राज्यातील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी चर्चेच्या फैरी झडत आहेत. महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षातील नेत्यांची गेल्या चार दिवसांपासून मॅरेथॉन बैठक सुरु असून जवळपास १५० च्या वर मतदारसंघांवर एकमत झाल्याची माहिती पुढे आली आहे. पक्षीय पातळीवर खलबते सुरु असतानाच इच्छुक उमेदवार देखील मोर्चेबांधणी करत आहेत. पुण्यातील पर्वती विधानसभा लढवण्यासाठी आग्रही असणारे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्याकडून काँग्रेससोबतच मित्र पक्षातील नेत्यांची भेट घेत साखर पेरणी केली जातेय.
आबा बागुल यांनी शनिवारी बारामतीमध्ये जात गोविंद बागेत जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि त्यांची दावेदारी कशी प्रबळ आहे, याचे रिपोर्ट कार्डच पवार यांच्या समोर मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात आजवर राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिला आहे. मात्र गेल्या तीन निवडणुकांत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना येथे पराभवाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे यंदा हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याच्या मागणीने जोर धारला आहे.
आबा बागुल हे गेली सहा टर्म म्हणजेच ३० वर्षांपासून नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेत काम करत आहेत. विरोधी पक्ष नेता, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर ते काँग्रेसचा गटनेता अशी पदेत्यांनी आजवर भूषवली आहेत. पर्वती मतदारसंघातून लढण्यासाठी ते २००९ पासून आग्रही आहेत, परंतु आघाडीच्या जागा वाटपात मतदारसंघ कायम राष्ट्रवादीकडे राहिल्याने त्यांची अडचण झाली. मात्र यंदा काहीही झालं तरी लढायचं आणि जिंकायचं हा नारा देत त्यांनी दंड थोपटले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे-बेंगळुरू बायपाससाठी ३०० कोटींचा निधी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हिरवा कंदील
-Assembly Election : राष्ट्रवादी-भाजपच्या वादात शिवसेनेची उडी; कोणत्या मतदारसंघावर केला दावा?
-निवडणुकीपूर्वीच शिरुरमध्ये राडा; घोडगंगा साखर कारखान्याच्या सभेत ‘अशोक पवार चोर है’चा नारा