पिंपरी : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच महाविकास आघाडीतून बाहेर पडून महायुतीसोबत जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील नाराजी अद्यापही दूर झालेली दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना चांगलंच डिवचलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये समरजीत घाटगे यांच्या मतदारसंघातील नागरिकांचा आवाज मेळाव्यानंतर सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलत होत्या.
‘शहरातील कारभारी वेगळा होता. म्हणून मी शहरात जास्त लक्ष देत नव्हते. आले तरी कार्यक्रम घेतला नाही. मला कोणाच्या कामात ढवळा-ढवळ करायला आवडत नाही. एका ताटात जेवल्यास त्या व्यक्तीचं ऋण आयुष्यभर विसरू नये. तो व्यक्ती सोबत असो वा नसो, कारण त्याने आपल्या सुख-दुःखात साथ दिलेली असते’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
‘सध्याचे राजकारण बघता ते बदलायला हवं. माझ्या आईला देखील सध्याचे राजकारण आवडत नाही. समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषणे सध्या नेते करत आहेत. एक दिवस पोलिसांना घरी पाठवा मग बघतो.. हे कोण सांगणार?. हा देश संविधानावर चालतो. कुठल्या अदृश्य शक्तीच्या मनमानीवर चालत नाही. अशा धमक्या तुम्ही कोणाला देता’, असा सणसणीत टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पर्वतीसाठी बागुलांचा गनिमी कावा, काँग्रेस नेत्यांनंतर थेट शरद पवारांची भेट; नेमकं चाललंय काय?
-पुणे-बेंगळुरू बायपाससाठी ३०० कोटींचा निधी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा हिरवा कंदील
-Assembly Election : राष्ट्रवादी-भाजपच्या वादात शिवसेनेची उडी; कोणत्या मतदारसंघावर केला दावा?