i Phone : भारतात आज आयफोन १६ चे ४ मॉडेल लॉन्च झाले आहेत. राज्यभरातून तसेच परराज्यातून मुंबईच्या वांद्रे येथे पहाटेपासून आयफोन लव्हर्सने मोठी गर्दी केली आहे. हा नवा आयफोन १६ घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. मात्र अनेकांचा मोबाईल स्टोअर बाहेर लांबच्या लांब रांगामुळे अनेकांचा हिरमूस झाला आहे.
तुम्हीही आयफोनचे चाहते असाल आणि या गर्दीत जाण्याची इच्छा नाही तर तुमच्याकडे एक उत्तम पर्याय आहे. तो म्हणजे आता हा आयफोन आता तुम्ही अगदी घरपोहच खरेदी करु शकता. हे क्वीक कॉमर्स प्लॅटफॉर्म ग्राहकांना अगदी १० मिनिटात हा स्मार्टफोन घरपोहोच मिळण्याची सोय उपलब्ध केली असल्याचा दावा करत आहे.
ब्लिंकिट आणि बिग बास्केट या ई-कॉमर्स कंपन्या आयफोन १६ फोन घरपोहच देण्याची सेवा देत आहे. आयफोन प्रेमींची संख्या लक्षात घेता या दोन्ही कंपन्यांनी अगदी १० मिनिटातच आयफोन ग्राहकांच्या हातात देण्याची धमाकेदार ऑफर आणली आहे. देशातील अनेक शहरातील ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. आज शुक्रवारपासून तुम्ही ब्लिंकीट आणि बीग बास्केट यांमार्फत आयफोन खरेदी करु शकता. बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर, मुंबईमधील ग्राहकांसाठी ही घरपोहच डिलिव्हरी मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरु; ओबीसीच्या ‘या’ बड्या नेत्यांने हाती घेतली ‘तुतारी’
-‘त्या-त्या वेळी मी माझा निर्णय जाहीर करेन’; अजितदादांच्या कट्ट्रर समर्थकांची बंडखोरीची भाषा
-”लाडकी बहिण’साठी शिक्षक, गोरगरीब विद्यार्थ्यांना अर्थिक संकटात टाकलं’; राज्य सरकारवर गंभीर आरोप
-कामाच्या अति तणावामुळे पुण्यात २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; अजित पवार म्हणाले, ‘मला आशा आहे की,…’