पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीमधील ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता ओबीसीचे समन्वयक ईश्वर बाळबुद्धे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
ओबीसी विभागाचे राज्य समन्वयक व प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे यांनी आज पुन्हा(शुक्रवारी) शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. ईश्वर बाळबुध्दे यांच्या पक्षप्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख उपस्थित आहेत. बाळबुध्दे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही दिवसांपूर्वीच राम-राम केला होता. आज त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
‘मी छगन भुजबळ साहेबांबरोबर गेली ३० वर्ष काम करतोय. पण मंडल आयोगाची आणि ओबीसी घटकाला खरा न्याय दिला ते शरद पवार आहेत आणि आता जर या वर्गाला ओबीसी घटकाला न्याय देण्यासाठी उभे करण्यासाठी कोणी प्रयत्न करतेय ते जयंत पाटील साहेब आहेत. आज थोडे वाईट वाटते की, ३० वर्ष छगन भुजबळ साहेबांसोबत होतो. मी आज त्यांना सांगितले त्यांना हात जोडून आलो की युती ओबीसीला न्याय देऊ शकत नाही, असं म्हणत बुद्धीबळे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘त्या-त्या वेळी मी माझा निर्णय जाहीर करेन’; अजितदादांच्या कट्ट्रर समर्थकांची बंडखोरीची भाषा
-”लाडकी बहिण’साठी शिक्षक, गोरगरीब विद्यार्थ्यांना अर्थिक संकटात टाकलं’; राज्य सरकारवर गंभीर आरोप
-कामाच्या अति तणावामुळे पुण्यात २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; अजित पवार म्हणाले, ‘मला आशा आहे की,…’
-महायुतीत पिंपरीच्या जागेवरुन कलह; शिंदेंच्या खासदारानं वाढवलं अजितदादांच्या आमदाराचं टेन्शन