पुणे : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने राज्यात अनेक विविध योजना राबवण्यास सुरवात केली आहे. यापैकी सर्वात चर्चेत असणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’. ही जाहीर झाल्यापासून चांगलीच चर्चेत आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगताना दिसत आहे. अशातच आता राज्यातील शिक्षण संस्थाचालकांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
राज्यातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सरकारची चुकीची धोरणे, चुकीच्या निर्णयांचा फटका विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालकांना बसत आहे. शिक्षण विभाग भ्रष्टाचाराने पोखरला असून, विद्यमान सरकारने विविध विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवून शिक्षक, संस्थाचालक आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक संकटात टाकले आहे, असा गंभीर आरोप राज्यातील शिक्षण संस्थाचालकांनी केला आहे.
राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या ६७ हजार आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, आरटीई शुल्क प्रतिपूर्तीचे २०१७ पासूनचे दोन हजार कोटी रुपये थकीत आहेत. शाळांना वेतनेतर अनुदान मिळत नाही. शिक्षणाची आर्थिक जबाबदारी सरकार टाळत आहे. त्यामुळेच कंत्राटी शिक्षक, समूह शाळा असे निर्णय घेतले जात आहेत, असे माजी आमदार ॲड. विजय गव्हाणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-कामाच्या अति तणावामुळे पुण्यात २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; अजित पवार म्हणाले, ‘मला आशा आहे की,…’
-महायुतीत पिंपरीच्या जागेवरुन कलह; शिंदेंच्या खासदारानं वाढवलं अजितदादांच्या आमदाराचं टेन्शन
-शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबच्या चर्चेवर अश्विनी जगताप म्हणाल्या, ‘मी शरद पवारांना…’
-पुणे मेट्रोची रेकॉर्ड ब्रेक कमाई; एका दिवसात साडे ३ लाख गणेशभक्तांनी केला प्रवास