पुणे : शहरातील मानाच्या गणपती विसर्जनानंतर गणेशभक्तांची पावले टिळक रोडवरील गणेश मंडळाकडे वळली. अनेक गणेश मंडळांच्या या रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. बहुतांश मंडळांनी डॉल्बीच्या भिंती उभारल्या होत्या;पण त्यामध्ये लक्षवेधी ठरला,शिवदर्शन मित्र मंडळचा ‘ती’चे अस्तित्व हा जिवंत देखावा! हा जिवंत देखावा पाहण्यास नागरिकांची अलोट गर्दी झाली होती.वाढत्या स्त्री अत्याचारावर आधारीत विषय हाताळल्याबद्दल मंडळाचे कौतुकही नागरिक करीत असल्याचे चित्र होते.
टिळक रोडवर दरवर्षी माजी उपमहापौर आबा बागुल अध्यक्ष असलेल्या शिवदर्शन मित्र मंडळाचा सामाजिक विषयावरील ज्वलंत देखावा हा गणेशभक्तांच्या औत्सुक्याचा विषय असतो. यावर्षी देखील मंडळाने आपली नेहमीची परंपरा जपत राज्यात काय देशात वाढत्या स्त्री अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हा जिवंत देखावा सादर करत टिळक रोडवरील गणेशभक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू तर ठरला शिवाय नागरिकांची उत्स्फूर्त दादही मिळवली आहे.
शिवदर्शन मित्रमंडळ येथून सकाळी १० वाजता विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. टिळक रस्त्यावर मंडळ आल्यानंतर मंडळाच्या मिरवणुकीत असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१ फुटी भव्य अश्वारूढ पुतळा लक्षवेधी ठरला. शिवाय श्रीक्षेत्र काशी विश्वेश्वर येथील प्रसिद्ध शिवतांडव ग्रुपच्या विशेष सादरीकरणाने नागरिकांना मंत्रमुग्धही केले.
यावेळी माजी उपमहापौर व मंडळाचे अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्रीताई बागुल, नंदकुमार बानगुडे, घनःश्याम सावंत, रमेश भंडारी, उत्सवप्रमुख अमित बागुल, हेमंत बागुल, ,सागर बागुल ,महेश ढवळे, सागर आरोळे, राम रणपिसे, संतोष पवार, इम्तियाज तांबोळी, समीर शिंदे, कुमार खटावकर, कुणाल आरडे, निलेश साखरे, सुयोग धाडवे , वासिम शेख,इर्शाद शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे गर्दीतही नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याची मंडळाने खबरदारी घेतल्याने जिवंत देखावा नागरिकांना भावला.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांचा आणखी एक मास्टरस्ट्रोक; भाजपचा विद्यमान आमदार लागणार गळाला?
-पठारेंच्या हाती तुतारी मात्र उमेदवारीची वाट खडतर, वडगाव शेरीवर ठाकरेसेनेचा दावा कायम
-जेष्ठ नेताच फडकवणार बंडाचं निशाण?; पुण्यात भाजपमध्ये धूसफूस वाढली
-‘या दादासाठी जशी लाडकी बहिण तसाच….’; आमच्यासाठी काय म्हणणाऱ्या तरुणांना अजित पवारांचं उत्तर