पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी प्रति महिना १५०० रुपये देणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ जाहीर केली. या योजनेचे पैसे अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले. मात्र ही योजना जशी जाहीर झाली तेव्हा पासून या योजनेवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच लाडकी बहिण म्हणत महिलांना आधार दिला मात्र, राज्यातील लाडक्या भावांचं काय? असा सवालही राज्यातील अनेक तरुण तसेच विरोधकांनी लावून धरला आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे उत्तर दिले आहे.
एकीकडे राज्यातील महिलांसाठी विविध घोषणा होत असताना राज्यातील तरुण मात्र आमच्यासाठी काय? असा प्रश्न राज्य सरकारला विचारात आहे. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी महाराष्ट्रवादी हेल्पलाइन सुरू करून केला आहे. याबाबत अजित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
‘जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके! योजनांची नांदी जशी बहिणींसाठी.. तशीच भावांसाठी सुद्धा माझ्या भावांना विनंती करतो की, आमचा महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाइन क्रमांक – ९८६१७१७१७१ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या. यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या प्रत्येक योजनेची माहिती सविस्तर मिळवा. लाभ घ्या, पंखांना बळ द्या!’, असे अजित पवार या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बाप्पा निघाले गावाला! दुपारचे २ वाजले तरी मिरवणूक काही संपेना
-पठारेंच्या हाती तुतारी; वडगाव शेरीत राजकीय समीकरण बदललं
-पुण्यात कायदा सुवस्थेचे धिंडवडे; ३ दिवसांत ३ गोळीबार, शहरात नेमकं काय चाललंय?
-ससून रुग्णालयात मोठा अर्थिक घोटाळा; ४ कोटी रुपयांचा गैरव्यावहार नेमका केला कोणी?