पुणे : पुणे शहराला सांस्कृतिक वासरा लाभला असून याच पुण्यातून सार्जवजनिक गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. पुणे शहरामध्ये सर्वात मोठा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते. शहरामध्ये मिरवणूका सुरु होऊन तब्बल २५ तास उलटले तरीही मिरवणूका अद्याप सुरुच आहे. आज संध्याकाळी ४ किंवा ५ च्या सुमारास या विसर्जन मिरवणुका संपण्याची शक्यता आहे.
मंगळवारी संध्याकाळी मानाच्या पाचही गणपती, त्या पाठोपाठ पुणे महापालिकेचा गणपती त्यानंतर अवघ्या पुणेकरांचे लक्ष लागून असलेला श्री श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक रात्री ९ च्या सुमारास अलका चौकात होती. त्यानंतर आता शहरातील इतर मंडळाचे गणपती विसर्जनासाठी निघाले आहेत.
आज (बुधवार) पुण्यातील लक्ष्मी रोड,केळकर रोड, टिळक रोडवर मंडळांची मिरवणूका सुरूच आहेत. कुमठेकर रोड वरील मिरवणुका संपल्या आहेत. लवकरात लवकर मंडळ पुढे काढण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मिरवणूक संपली होती. मागील वर्षी जवळपास २८ तास विसर्जन मिरवणूक चालली होती.
यावर्षी मिरवणूक कधी संपते या कडे लक्ष लागलं आहे. यावेळी देखील मिरवणुका उशिरापर्यंत चालतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस मिरवणुका लवकर संपवाव्या यासाठी प्रयत्न करत आहेत. पुण्यातील अलका चौकातून आतापर्यंत १२० पेक्षा जास्त मिरवणुका गेल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पठारेंच्या हाती तुतारी; वडगाव शेरीत राजकीय समीकरण बदललं
-पुण्यात कायदा सुवस्थेचे धिंडवडे; ३ दिवसांत ३ गोळीबार, शहरात नेमकं काय चाललंय?
-ससून रुग्णालयात मोठा अर्थिक घोटाळा; ४ कोटी रुपयांचा गैरव्यावहार नेमका केला कोणी?
-महायुतीत वाद होण्याची शक्यता; शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला पुण्यातील एकच जागा?