पुणे : पुणे शहरात एकीकडे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे तर दुसरीकडे भरदिवसा गोळीबार, खून होत आहेत. शहरात गणेशोत्सवापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळीबार आणि कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरुन गेलं होतं. त्यातच आता सलग ३ दिवस गोळीबार झाल्याचं समोर येत आहे.
सोमवारी (आज) भरदिवसा वाळू व्यावसियाकावर गोळीबार करण्यात आला आहे. शहरात कायदा सुव्यवस्था नावाला देखील शिल्लक राहिली नाही, हे शहरात होणाऱ्या गुन्हेगारी घटनांवरुन समोर येत आहे. शहरामध्ये गणपती उत्सवाची धामधूम सुरू असतानाच वाळू व्यवसायिकावर गोळीबार झाल्याने शहर पुन्हा एकदा हादरले आहेत. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याच प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
शनिवारी रात्री पुण्यातील सिंहगड किल्ल्याजवळ असलेल्या सांबरेवाडी येथे २ गटामध्ये गोळीबार झाला होता. या प्रकारात एकाच जागीच मृत्यू होता. तर दुसरा गंभीर होता. त्यातच उरूळी कांचन भागात गोळीबाराची घटना घडली. बापू शितोळे या व्यक्तीने तीन ते चार जणांवर गोळीबार केला होता. त्यात काळुराम गोते हे गंभीर जखमी झाले होते. आता पुणे शहरातील कोंढव्यात गोळीबाराची घटना सोमवारी घडली. गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ससून रुग्णालयात मोठा अर्थिक घोटाळा; ४ कोटी रुपयांचा गैरव्यावहार नेमका केला कोणी?
-महायुतीत वाद होण्याची शक्यता; शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला पुण्यातील एकच जागा?
-पुणेकरांनो विसर्जन मिरवणुकीला घराबाहेर पडताना आधी हे वाचाच, शहरातील वाहतुकीत मोठा बदल
-हडपसर विधानसभेतून चेतन तुपेंचा पत्ता कट? नाना भानगिरेंना संधी मिळण्याची शक्यता