पुणे : ससून रुग्णालयामध्ये झालेल्या अनेक गोष्टींमुळे या रुग्णालयाचे नाव चर्चेत आहे. कल्याणीनगर अपघाता प्रकरणामध्ये देखील या रुग्णालयाचे नाव वारंवार समोर येत होते. आता याच रुग्णालयातील आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. रुग्णालयाच्या तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यासह १६ कर्मचाऱ्यांनी ४ कोटी १८ लाख रुपयांचा अपहार केला आहे.
या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने चौकशी केली होती. या चौकशी अहवालाच्या आधारे रुग्णालय प्रशासनाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. ससून रुग्णालयातील तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अनिल माने हा या प्रकरणी मुख्य सूत्रधार आहे.
त्याच्यासह एकूण २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात ससून रुग्णालयातील रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार, कक्षसेवक नीलेश शिंदे, अधिपरिचारिका सुमन वालकोळी, अधिपरिचारिका अर्चना अलोटकर, अधिपरिचारिका मंजूषा जगताप, वरिष्ठ लिपिक संतोष जोगदंड, कनिष्ठ लिपिक श्रीकांत श्रेष्ठ, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक संदीप खरात, अधिपरिचारिका नंदिनी चांदेकर, अधिपरिचारिका सरिता लोहारे, सेवानिवृत्त सीटी स्कॅन तंत्रज्ञ उत्तम जाधव, सेवानिवृत्त आया सुनंदा भोसले यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महायुतीत वाद होण्याची शक्यता; शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला पुण्यातील एकच जागा?
-पुणेकरांनो विसर्जन मिरवणुकीला घराबाहेर पडताना आधी हे वाचाच, शहरातील वाहतुकीत मोठा बदल
-हडपसर विधानसभेतून चेतन तुपेंचा पत्ता कट? नाना भानगिरेंना संधी मिळण्याची शक्यता
-पॅरॉलिंपिक वीर सचिन खिलारीला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ५ लाखांचे बक्षिस