पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून मंगळवारी गणेश विसर्जन होणार आहे. या अनंत चतुर्दशीला शहरातील सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सोमवारी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर पुण्यातील प्रमुख १७ रस्ते हे बंद केले जाणार आहेत. विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत.
कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार?
शिवाजी रोड- काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक, लक्ष्मी रोड- संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक, बाजीराव रोड- सावरकर चौक ते फुटका बुरूज चौक, कुमठेकर रोड -टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक, गणेश रोड- दारूवाला पुल ते जिजामाता चौक, केळकर रोड- बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक, टिळक रोड- जेधे चौक ते टिळक चौक, शास्त्री रोड- सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौक, जंगली महाराज रोड- झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक, कर्वे रस्ता- नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक, फर्ग्युसन रोड- खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट, भांडारकर रस्ता- पी.वाय.सी जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक, पुणे सातारा रोड- व्होल्गा चौक ते जेधे चौक, सोलापुर रोड- सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक, प्रभात रोड- डेक्कन पोस्टे ते शेलारमामा चौक, बगाडे रोड- सोन्या मारूती चौक ते फडके हौद चौक, गुरू नानक रोड- देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक.
१) जंगली महाराज रोड झाशी राणी चौक, २) शिवाजी रोड :- काकासाहेब गाडगीळ पुतळा ३) मुदलीयार रोड :- अपोलो टॉकीज / दारुवाला पुल ४) लक्ष्मी रोड :- संत कबीर पोलीस चौकी ५) सोलापूर रोड :- सेव्हन लव्हज चौक ६) सातारा रोड : व्होल्गा चौक ७) बाजीराव रोड :- सावरकर पुतळा चौक ८) लाल बहादुर शास्त्री रोड सेनादत्त पोलीस चौकी ९) कर्वे रोड :- नळस्टॉप १०) फर्ग्युसन कॉलेज रोड :- गुडलक चौक
नो पार्किंग
१) लक्ष्मी रोड संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक २) केळकर रोड :- बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक ३) कुमठेकर रोड :- शनिपार चौक ते अलका टॉकीज चौक ४) टिळक रोड : जेधे चौक ते अलका टॉकीज चौक ५) बाजीराव रोड :- पुरम चौक ते फुटका बुरुज चौक ६) शिवाजी रोड :- गाडगीळ पुतळा ते जेधे चौक ७) शास्त्री रोडः सेनादत्त पोलीस चौकी ते अलका टॉकीज चौक ८) जंगली महाराज रोड झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक ९) कर्वे रोड : नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक १०) फर्ग्युसन कॉलेज रोड खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक
महत्वाच्या बातम्या-
-हडपसर विधानसभेतून चेतन तुपेंचा पत्ता कट? नाना भानगिरेंना संधी मिळण्याची शक्यता
-पॅरॉलिंपिक वीर सचिन खिलारीला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ५ लाखांचे बक्षिस
-गणेश विसर्जनादिवशी शहरातील ‘हे’ १७ मुख्य रस्ते असणार बंद; कोणत्या रस्त्यावर पार्किंग मनाई?
-ठाकरेंचा पुण्यातील ३ मतदारसंघांवर दावा? जागा वाटपात होणार जोरदार खडाखडी