पुणे : शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे. राज्यात काय पुणे शहरातही कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काळात ‘वाहतूक कोंडी मुक्त शहर’ आणि ‘महिलांसाठी सुरक्षित पुणे’ हाच संकल्प असून त्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेतला जाईल असे ठोस आश्वासन माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी येथे दिले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त पर्वती विधानसभा मतदारसंघात शिवदर्शन येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात नागरिकांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना आबा बागुल यांनी हा संकल्प जाहीर केला. यावेळी पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्रीताई बागुल, पदाधिकारी नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, कपिल बागुल, अमित बागुल , हेमंत बागुल यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आबा बागुल यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची अभूतपूर्व गर्दी होती.
आता ‘आबा आमदार झालेच पाहिजे’, ‘३० वर्षांचा विश्वास सार्थ ठरणार,’आबा’ च आता ‘पर्वती’चा कायापालट करणार’,’आमदार आपला कसा असावा…आबा बागुल यांच्यासारखा विकासावर भर देणारा असावा, कर्तृत्व सिद्ध करणारा असावा’ अशा घोषणा उपस्थित नागरिकांकडून दिल्या जात होत्या.
‘आजवर सलग सहावेळा नागरिकांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ केला आहे. आज वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेले प्रेम हे कधीही विसरू शकणार नाही. यंदा मी आमदार होणारच असे स्पष्ट करताना आबा बागुल म्हणाले, आज शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे. राज्यात काय पुणे शहरातही कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे.कोयता गँगचा उद्रेक वाढला आहे. हे पाहता, वाहतूक कोंडीमुक्त शहर व महिलांसाठी सुरक्षित पुणे हाच संकल्प मी सोडला आहे आणि तो मी पूर्णत्वास नेण्यासाठीच कटिबद्ध आहे. आमदार झाल्यावर प्राधान्याने हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही आबा बागुल यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-गणेश विसर्जनादिवशी शहरातील ‘हे’ १७ मुख्य रस्ते असणार बंद; कोणत्या रस्त्यावर पार्किंग मनाई?
-ठाकरेंचा पुण्यातील ३ मतदारसंघांवर दावा? जागा वाटपात होणार जोरदार खडाखडी
-पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
-अजित पवारांकडून निवडणूक आयोगाचा नियम भंग; इव्हिएम रथाला हिरवा झेंडा दाखवला?
-‘राहुल गांधींनी माफी मागितली नाही तर…’; पुण्यात शिवसेना आक्रमक, नेमका काय प्रकार?