पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्ष जोमाने तयारी करत आहेत. अशातच काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ईव्हीएम रथाला झेंडा दाखवून नियमांचा भंग केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी खेड तहसीलदारांकडे खुलासा मागवला आहे.
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) जनजागृती आणि प्रात्यक्षिक, जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ खेड तहसील कार्यालयाच्या आवारात अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या कक्षेतील हा कार्यक्रम इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित न करता मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आल्याने तालुका निवडणूक अधिकाऱ्यांकडून आचारसंहिता भंगाचा पश्न निर्माण झाला आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांनी अजित पवार यांच्या हस्ते या फिरत्या रथाचे उद्घाटन करून शुभारंभ केल्याचे बोलले जाते. या प्रकरणी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तहलसीदार ज्योती देवरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
निवडणूक आयोगाचे कार्यक्रमाच्या नियमाप्रमाणे निवडणूक आयोगाचे कार्यक्रम मंत्री, लोकप्रतिनिधी किंवा ठराविक राजकीय पक्षाच्या प्रमुख किंवा प्रतिनिधींच्या उपस्थितीत घेऊ नयेत, असा नियम असताना देखील निवडणूक आयोगाचे सर्व नियम धाब्यावर बसवून खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मतदान यंत्र हाताळणी व प्रशिक्षण कार्यक्रम जनजागृती रथाचे उदघाटन केले आहे. यावरुन आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘राहुल गांधींनी माफी मागितली नाही तर…’; पुण्यात शिवसेना आक्रमक, नेमका काय प्रकार?
-पुण्यात विधानसभेचे मतदारसंघ ८ अन् महाविकास आघाडीच्या इच्छुकांची संख्या ८५; कसं असणार जागावाटप?
-पुण्यात विधानसभेच्या ८ मतदारसंघात महाविकास आघाडीच्या इच्छुकांची संख्या ८५
-पुणेकरांनो सावधान! झिकाचा प्रादुर्भाव वाढतोय; आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू तर रग्णसंख्या किती?
-पर्वतीमध्ये आबा बागुलांना वाढता पाठिंबा; गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रचाराची एक फेरी पूर्ण