पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी आद पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई यांनी लाडकी बहिण योजनेबात भाष्य केले आहे. पुण्यात पत्रकारांनी ‘लाडकी बहीण योजने’ संदर्भात प्रश्न विचारताना फक्त ‘लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख करताच “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणा. तुम्हीही सरकारी नाव जे आहे तेच घेत जा”, असे शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
‘लाडकी बहीण योजना नाही तर ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’, असा उल्लेख करत जा. कालपासून इतर लोकही ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ हे नाव घ्यायला लागले आहेत. नवीन योजना होती. त्यामुळे बऱ्याचदा चुकून फक्त लाडकी बहीण योजना असं म्हटलं जायचं. पण आता महायुतीतले सगळे पक्ष या योजनेचा उल्लेख करताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असा करत आहेत’, असे शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
‘२ दिवस मी मतदारसंघातल्या पंधरा-वीस गावांमध्ये काही महिलांना या योजनेसंदर्भात भेटलो. महिलांना विचारलं ही योजना कुणी आणली? तर त्या स्पष्टपणे सांगत आहेत की, एकनाथ शिंदेंनी आणली. त्यामुळे ही योजना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं आणल्याचं महिलांमध्ये नक्की आहे’, असंही शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Assembly Election: महाविकास आघाडीत रस्सीखेच; पुण्यातील ८ जागांवर ठाकरे गटाचा दावा
-‘…तर तुरुंगातच टाकतो’; ‘लाडकी बहिण’वरुन अजित पवारांनी दिला सज्जड इशारा
-अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक; वाचा नेमकं कारण काय?
-विधानसभेसाठी अजित पवारांच्या २५ उमेदवारांची यादी जाहीर; बारामतीमधून कोण लढणार?
-‘अशा वृत्तींना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही’; हिंदू देवतांचा अपमान केल्याने हेमंत रासने आक्रमक