पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. ऐन विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारकडून राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ जाहीर केली आहे. या योजनेला महिलांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने या योजनेची जाहिरात करताना मुख्यमंत्री हा शब्दच वगळला. यावरुन मोठा वादंग निर्माण झाला. त्यातच आता अजित पवारांनी या लाडकी बहिण योजनेवरुन थेट तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला आहे.
‘एका दाम्पत्याने लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी तब्बल २६ वेळा अर्ज केला अन् लूट केली. आम्ही सरकार म्हणून देतो पण जर कोणी अशी फसवणूक केली तर मग तुरुंगातही टाकतो. मग चक्की पिसिंग करा’, असं म्हणत अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना सज्जड दम भरला आहे.
‘अनेक महिला संजय गांधी निराधार योजनेसोबतच ‘लाडकी बहीण’ योजनेचा देखील फायदा घेऊ इच्छितात. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला एकाच योजनेचा लाभ मिळेल. सगळंच पाहिजे असेल, तर सरकारची तिजोरी खाली होईल. मग ब्रम्हदेव आला तरी काही शक्य होणार नाही’, असेही अजित पवारांनी खडसावून सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक; वाचा नेमकं कारण काय?
-विधानसभेसाठी अजित पवारांच्या २५ उमेदवारांची यादी जाहीर; बारामतीमधून कोण लढणार?
-‘अशा वृत्तींना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही’; हिंदू देवतांचा अपमान केल्याने हेमंत रासने आक्रमक
-पुण्यात कट्टर राजकीय विरोधक येणार एका मंचावर; अजित पवार-सुरेश कलमाडी एकत्र येणार?
-‘मायक्रोसॉफ्ट’ने पुण्यात खरेदी केली ५२० कोटींची जमीन; आता कोणता प्रकल्प उभारणार?