पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद नढे यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. विनोद नढेसह सचिन नढे यालाही अटक करण्यात आली आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी विनोद नढे हे पिस्तूल वापरतात. याच पिस्तुलातून सचिन नढे यांने भिंतीवर फायरिंग केले. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. ही घटना रात्री पावणे ९ वाजताच्या सुमारास घडली आहे.
विनोद नढे आणि त्यांचा चुलत भाऊ सचिन नढे यांच्यासह काही जण राहुल बार अँड खुशबू हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर मद्यपान करत बसले होते. त्याच दरम्यान विनोद नढे यांना त्यांच्या चुलत्याचा फोन आला. कशाला फिरतो? काळजी घेत जा? असा सल्ला चुलत्याने दिला. त्यावर विनोद नढे यांनी सांगितलं की, माझ्याकडे सुरक्षेसाठी पिस्तूल आहे. हे ऐकून चुलत भाऊ सचिन नढे याने गमतीत खरंच तुझ्याकडे पिस्तूल आहे, का? अशी विचारणा केली आणि ते पिस्तूल घेऊन लोड करून थेट गोळीबार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ती गोळी प्लेट ठेवायचा कपटावर लागली. सुदैवाने ही गोळी शेजारी बसलेल्या व्यक्तीला लागली नाही. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वाकड पोलिसांनी सचिन नढे आणि विनोद नढे या दोघांना अटक केली आहे. नढे यांच्या गोळीबाराने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभेसाठी अजित पवारांच्या २५ उमेदवारांची यादी जाहीर; बारामतीमधून कोण लढणार?
-‘अशा वृत्तींना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही’; हिंदू देवतांचा अपमान केल्याने हेमंत रासने आक्रमक
-पुण्यात कट्टर राजकीय विरोधक येणार एका मंचावर; अजित पवार-सुरेश कलमाडी एकत्र येणार?
-‘मायक्रोसॉफ्ट’ने पुण्यात खरेदी केली ५२० कोटींची जमीन; आता कोणता प्रकल्प उभारणार?
-पुणेकरांना ‘वंदे भारत’ची पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार; नेमकं कारण काय?