पुणे : राज्यात सध्या एकीकडे गणेशोत्सव सुरु आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून राज्यभर मेळावे घेताना दिसत आहे. आज अजित पवार यांचा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये दौरा सुरु आहे. या दौऱ्यामध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसते ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे कोठेच दिसत नाहीत. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवारांच्या मेळाव्याला पाठ फिरवणारे शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरुर लोकसभेत आल्यावर आवर्जून उपस्थित राहतात. आढळराव पाटलांनी लोकसभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला खरा पण ते आता अजित पवारांपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या जास्त जवळ असल्याचे पहायला मिळते.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे भीमाशंकरच्या दर्शनासाठी आले असता तसेच वारकरी सांप्रदयाच्या कार्यक्रमासाठी सर्वात आधी शिवाजीराव आढळराव पाटील हे उपस्थित होते. मात्र अजित पवार शिरुर मतदारसंघात आले तर आढळराव नेहमी गैरहजर राहिल्याचे पहायला मिळाले, यावरुन अनेक राजकीय चर्चा रंगल्या. आता आढळराव आणि शिंदेंची जवळीक पाहून आढळराव पाटील हे पुन्हा शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वनराज आंदेकर प्रकरण: गुन्हे शाखेकडून ८ पिस्तुलं १३ काडतुसे जप्त, अन्…
-पुणेकरांनो सावधान! एक कॉल तुमचं बँक अकाऊंट साफ करू शकतो; ८ महिन्यात २८ कोटींची लूट
-पुण्यात तीन जागांवर महायुतीची डोकेदुखी; भाजपसह राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या दाव्याने चुरस
-पुणेकरांना आता शहरातील ध्वनीप्रदूषणाची पातळी पाहता येणार; शहरात लागणार डिजीटल बोर्ड