पुणे : पुणे शहरामध्ये गुन्हेगारी, अपघाचे प्रमाण काही कमी होत नाही. पुण्यात आता आणखी एक धक्कादायक अपघात झाल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. पौडफाटा परिसरात एका टेम्पो मद्यधुंद चालकाने श्रीकांत अमराळे आणि गीतांजली अमराळे या दाम्पत्याला चिरडले. या अपघातामध्ये गीतांजली अमराळेंचा मृत्यू झाला आहे.
कोथरुड परिसरातील करिश्मा चौकात हा अपघात घडला. टेम्पो चालक आशिष पवार हा दारुच्या नशेत करिश्मा चौकातील गाड्यांना धडक देत चालला होता. त्याचा टेम्पो करिश्मा चौकातील सिग्नलजवळ आला तेव्हा त्याठिकाणी मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे आणि त्यांची पत्नी गीतांजली अमराळे उभे होते. आशिष पवारने दारुच्या नशेत टेम्पो त्यांच्या अंगावर घातला. यामध्ये गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीकांत अमराळे हे गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला. त्यांनी आशिष पवारला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
करिश्मा चौकापासून मद्यधुंद टेम्पो चालक आशिष पवारने तब्बल ७ ते ८ जणांना उडवत आला. त्यानंतर टेम्पो चालकाने सावरकर उड्डाण पुलाखाली ३ जणांना उडवले. या घटनेनंतर नागरिकांनी टेम्पो चालकाला गाडीतून उतरवून मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत आता पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-वनराज आंदेकर प्रकरणी मोठा ट्वीस्ट; ‘त्या’ आरोपीलाही ठोकल्या बेड्या
-ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; ‘हा’ माजी आमदार हाती घेणार ‘तुतारी’
-‘पिकतं तिथं विकत नसतं, बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा’; अजितदादा असं का म्हणाले?
-विधान परिषदेच्या आमदारकीसाठी राष्ट्रवादीत कलह; बारामतीत कार्यकर्त्यांनी अडवला अजितदादांचा रस्ता