बारामती | पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मेळव्यात बारामतीकरांना संबोधित केले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशावर भाष्य केले आहे. ‘विकासकामे करुन देखील जर बारामतीकर वेगळा निर्णय घेणार असतील तर बारामतीला देखील वेगळा आमदार मिळाला पाहिजे’, असं अजित पवार म्हणाले.
‘मला एका गोष्टीची जाणीव आहे, कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष चालतो. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. त्या कण्यानं काम नाही केलं तर गडबड होते मान्य केलं पाहिजे. कोणतीही निवडणूक असो किंवा आजची बैठक असो, कार्यकर्त्यांच्या एकंदरित जिवावर निवडणूक आणि यश अवलंबून असते. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आता उपमुख्यमंत्रिपदापर्यंत अनेक जबाबदारी कार्यकर्त्यांमुळं मिळाली.’
‘मी पण शेवटी माणूस आहे, मला पण विचार येतो एवढी सगळी कामं करुन बारामतीकर वेगळा निर्णय घेऊ शकतात. मग आपण तर दुसऱ्यांना खासदार करु शकतो. नितीन पाटलांना, प्रफुल पटेलांना खासदार केलं. आमदार राजेश विटेकरला केलेलं तुम्ही पाहिलं, शिवाजीराव गर्जे यांना आमदार केलं. अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली. आपण लाखानं निवडून येणारी माणसं, मी पण आता ६५ वर्षांचा झालो. आपण पण तसं समाधानी आहे. जिथं पिकतं तिथं विकत नसतं, बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे, मग तुम्ही माझी १९९१ ते २०२४ या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या माणसाचं काम बघा’, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेच्या आमदारकीसाठी राष्ट्रवादीत कलह; बारामतीत कार्यकर्त्यांनी अडवला अजितदादांचा रस्ता
-भाजप आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी; नेमका काय प्रकार?