पुणे : पुणे शहरामध्ये अनेक भागांत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा खड्ड्यांमुळे अपघातही झाले आहेत. अशातच आता कोथरुडकरांना खड्डेमुक्त करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून मतदारसंघातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरुडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे शहरात सुरू जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी खड्डे बुजविण्यात येतील, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे या कामात अडथळे येत आहेत.
परिणामी वारंवार पडणाऱ्या पावसामुळे नव्याने खड्डे पडण्याने नागरिक देखील हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून मतदारसंघातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.
या अंतर्गत आतापर्यंत कोथरुड मतदारसंघातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडीमधील मुख्य रस्त्यांवरील ४० खड्डे, कोथरूडमधील ३०० खड्डे बुजवले आहेत. उर्वरित खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरुडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराबद्दल कोथरुडकरांकडून समाधान व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-श्रीमंत दगडूशेठ बाप्पाच्या चरणी एक कोटींचा हिरा
-‘नितेश राणेंनी मुस्लीम समाजाची माफी मागावी’; रिपब्लिकन पक्षाची मागणी
-‘उन्माद दाखवत असाल तर…’; अमोल कोल्हेंचा दिलीप वळसे पाटलांना इशारा