पुणे : गणेशोत्सवाला आज मोठ्या जल्लोषात धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. पुणेकरांसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी एका भक्ताने एक कोटी रुपयांचा हिरा अर्पण केला आहे. सर्व सुवर्ण आभूषणांनी नटलेल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सौदर्यांत या हिऱ्यामुळे आणखीणच भर पडली. हा १ कोटी रुपयांचा हिरा बाप्पाच्या मस्तकावर लावण्यात आला आहे.
हा हिरा या भक्ताने २ दिवसांपूर्वीच दगडूशेठ चरणी अर्पण केला आहे. त्यामुळे सोन्याच्या आभूषणांनी नटलेल्या बाप्पाच्या मस्तकावर आता हा हिरा लावण्यात आला असून मस्तकी लावलेल्या या हिऱ्यामुळे बापाचं सौदर्यं अधिक खुलून दिसू लागलं आहे. आज बाप्पाच्या आगमनासाठी खास सिंह रथाची आकर्षक अशी सजावट करण्यात आली.
अनेक ढोल-ताशांच्या गजराने गणरायाला सलामी देण्यात आली. त्यानंतर सिंहरथातून गणपती बाप्पाची जंगी मिरवणूक काढण्यात आली. यंदा बाप्पासाठी जलोटी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मिरवणुकीनंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा जटोली मंंदिरात (प्रतिकृती) विराजमान झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘नितेश राणेंनी मुस्लीम समाजाची माफी मागावी’; रिपब्लिकन पक्षाची मागणी
-‘उन्माद दाखवत असाल तर…’; अमोल कोल्हेंचा दिलीप वळसे पाटलांना इशारा
-श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मिरवणूक; सिंहरथ अन् ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत
-Pune: लाडक्या गणरायाचं जल्लोषात आगमन; भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था कशी असेल?