पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांच्यामध्ये भीमाशंकर साखर कारखान्याच्या सभेत राडा झाल्याचे पहायला मिळाले. यावर बोलताना शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलीप वळसे पाटलांना इशारा दिला आहे.
येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर कारखान्याची बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये तुफान जुंपल्याचं चित्र पहायला मिळालं. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पोलिसांनी वाद होऊ नये म्हणून हस्तक्षेप केला. त्यानंतर कारखान्याची सभा सुरु झाली.
‘कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये जी दुर्दैवी घटना घडली ती अत्यंत निषेधार्य आहे. या सर्वसाधारण सभेत सभासद असणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणं देखील ऐकून घेण्यात आलं नाही तसंच विद्यमान संचालक देवदत्त निकम यांना देखील शेतकऱ्यांची बाजू मांडून दिली नाही’, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
‘शेतकऱ्यांना झालेल्या मारहाणीची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. जनता हे सगळं पहात असून जर आमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही असा उन्माद सत्ताधारी अथवा कार्यकर्त्यांकडून दाखवण्यात येत असेल तर घोडे मैदान जवळच आहे. जनता अशा उन्मादाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा अमोल कोल्हे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मिरवणूक; सिंहरथ अन् ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत
-Pune: लाडक्या गणरायाचं जल्लोषात आगमन; भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था कशी असेल?
-काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर; धंगेकरांच्या उमेदवारीला कोणी केला विरोध?
-वडगाव शेरीत भाजपला गळती? पंकजा मुंडेंच्या बैठकीला माजी आमदारासह नगरसेवकांची दांडी