पुणे : सर्व गणेश भक्त आतुरतेने वाट पाहत होती ती आतुरता आता संपली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. पुण्यातील मानाच्या ५ गणपतींच्या मिरणवणुकीला सुरवात झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत होत आहे.
पुण्यात मानाच्या गणपतीबरोबरच पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे थाटात आगमन झाले आहे. लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा पाहण्यासाठी पुणेकर उत्सुकता झाले आहेत. या वर्षी सिंह रथामधून दगडूशेठ गणपतीची मिरवणूक निघाली आहे. सिंह रथाला फुलांची सुंदर आरास केली आहे.त्यानंतर जटोली शिव मंदिराता दगडशेठ गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी अनेक ढोल-ताशा पथकं वादन करत आहेत. ध्वज उंचावून बाप्पाला मानवंदना देण्यात आली. दगडूशेठ मंदिराचा परिसर भक्तांनी गजबजून गेला आहे. बाप्पाच्या मिरवणुकीला पुणे शहरात वरुण राजाने देखील हजेरी लावली आहे. दगडूशेठ मंदिराच्या परिसर ‘मोरया मोरया’च्या जयघोषाने दुमदुमला आहे. दगडूशेठ गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे.