पुणे : अवघ्या २ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची राज्याभर रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षांच्या राजकीय गाठीभेटी, सभा, बैठका, आढावा बैठका, मतदारसंघांची चाचपणी, उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील ६ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महायुतीमध्ये वरिष्ठ पातळीवर सर्व नेत्यांनी एकत्रित लढण्याचे ठरवले असले तरीही स्थानिक पातळीवर मात्र महायुतीच्या नेत्यांमध्ये तू-तू मै-मै सुरु आहे.
पंकजा मुंडेंकडे सोपवण्यात आलेल्या जबाबदारीनुसार त्या पुण्यातील मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. त्यातच वडगावशेरीचा आढावा बैठक घेण्यात येत आहेत. या बैठकीला स्थानिक नेते दांडी मारत असल्याचे चित्र समोर आले आहे. यावरुन महायुतीच्या स्थनिक नेत्यांमध्येच नव्हे तर एकाच पक्षामधील पदाधिकाऱ्यांमध्येच मोठ्या प्रमाणात मतभेद असल्याचे पहायला मिळत आहेत. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले माजी आमदार बापू पठारे यांच्यासह भाजपच्या ६ नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असल्याने बैठकीला दांडी मारल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बापू पठारे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. बापू पठारे हे शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज मुंडेंनी घेतलेल्या बैठकीला पठारेंनी दांडी मारल्याने शरद पवार पक्षात जाण्याच्या चर्चेला बळ मिळत आहे. नाराज बापू पठारेंची मनधरणी करण्यात महायुतीला यश मिळतंय का? पठारे तुंतारी फुंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वनराज आंदेकर हत्येनंतर पुण्यात टोळीयुद्ध भडकणार?; वडिल सुर्यकांत आंदेकरांनी घेतली शपथ
-पुणे वनराज आंदेकर खून प्रकरण: पोलिसांनी तीघांना घेतलं ताब्यात, खूनाचं कारण काय?
-पुणे हादरले! राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; प्रकृती गंभीर
-बाप्पा निघाले काश्मीरला! युवा उद्योजक पुनीत बालन आणि मानाच्या गणेश मंडळांचा पुढाकार
-पर्वतीत रिक्षा चालकांना मिळणार मोफत गणवेश; श्रीनाथ भिमालेंचा स्तुत्य उपक्रम