पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी रविवारी १ सप्टेंबर रोजी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेमध्ये उपचारादरम्यान आंदेकरांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वनराज आंदेकर यांच्या दोन बहिणी आणि दोघींचेही पती अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
वनराज आंदेकर यांचे वडिल हे सूर्यकांत ऊर्फ बंडू राणूजी आंदेकर हे आंदेकर टोळीचे मुख्य आहेत. वनराज यांची कौटुंबिक वादातून आणि टोळीयुद्धातून हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर सूर्यकांत आंदेकर यांनी आपल्याच मुली आणि जावयांविरोधात फिर्याद दिली आहे. आंदेकरांच्या हत्येने संपूर्ण पुणे शहर हादरुन गेले आहेत.
वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर पुणे शहरामध्ये टोळी युद्ध भडकण्याची शक्यता आहे. यावर आता सुर्यकांत आंदेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी शपथ घेऊन सांगतो असं काही करणार नाही. मी आता न्यायाची वाट बघेल. आम्ही गुन्हेगार होतो तर आम्हाला मारायचं होतं, निरपराध मुलाला का मारलं?’ असा प्रश्न सुर्यकांत आंदेकरांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे वनराज आंदेकर खून प्रकरण: पोलिसांनी तीघांना घेतलं ताब्यात, खूनाचं कारण काय?
-पुणे हादरले! राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; प्रकृती गंभीर
-बाप्पा निघाले काश्मीरला! युवा उद्योजक पुनीत बालन आणि मानाच्या गणेश मंडळांचा पुढाकार
-पर्वतीत रिक्षा चालकांना मिळणार मोफत गणवेश; श्रीनाथ भिमालेंचा स्तुत्य उपक्रम
-‘सकाळी लवकर उठता मग, आमच्यावर उपकार करता का? सुप्रिया सुळेंनी नाव न घेता अजितदादांना सुनावलं