पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील अनेक गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. भर रस्त्यावर दिवसरात्र काहीही न पाहता चार चौघात कसलीही भिती न बाळगता खून, कोयता गँगची दहशत अशा प्रकारचे गुन्हे सर्रास घडत आहेत. यावरुन शहरात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून पुणे शहरात नेमकं चाचलंय तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून करण्यात येत आहे. आजही शहरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
प्रेयसीच्या ४ वर्षांच्या मुलाने उलटी केल्याचा राग एका नराधमाला आला. आणि याच रागातून त्याने आपल्या प्रेसयीच्या मुलाला बेदम मारहाण केली. यात ४ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर प्रियकराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. महेश कुंभार (रा. पंचवटी नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. तर वेदांश काळे (वय ४ वर्षे, रा. बिबवेवाडी) असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.
१ सप्टेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर वेदांशने अचानक उलटी केली. त्यानंतर आरोपी महेश कुंभार चिडला. त्याने मुलाला हाताने आणि झाडूने बेदम मारले. या घटनेत वेदांश बेशुध्द झाला. त्यावेळी त्याच्या आईने खाटेवरून खाली पडल्याने बेशुद्ध झाल्याचा बनाव करत त्याची आई पल्लवीने मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयात त्याला उपचारांसाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान वेदांशचा मृत्यू झाला. आणि शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर आलं. शवविच्छेदन अहवालात वेदांशचा मृत्यू बेदम मारहाणीमुळे झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केले आहे, त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. तपासामध्ये चिमुरड्याच्या मृत्यूचे सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महेश कुंभारला अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘आता बाप दाखव नाहीतर तर श्राद्ध कर, हा सूर्य…’; पंकजा मुंडेंची शरद पवार गटावर आगपाखड
-गणेशोत्सवात आवाज कमी; गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना मेधा कुलकर्णींचं आवाहन
-नाना पटोलेंसाठी भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणा अन् बागुलांना उमेदवारी देण्याची मागणी
-…म्हणून पालिकेने गणेश मूर्ती विक्रेते अन् मंडळांना धाडल्या नोटीसा; वाचा कारण काय?
-महायुतीत वडगाव शेरीवरुन खडाजंगी; भाजप-राष्ट्रवादीचा वाद शिगेला, नेमकं कारण काय?