पुणे : राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. पक्षांकडून जय्यती तयारी देखील सुरु आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केलं. तसेच ‘नाना पटोले भावी मुख्यमंत्री’ म्हणून घोषणा देण्यात आल्या.
महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो, नाना पटोले जैसा हो, अशा घोषणाही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. नाना पटोले यांना खांद्यावर घेत नाना पटोलेंच्या भावी मुख्यमंत्र्यांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी पर्वती मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे आबा बागुल यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी देखील कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपाआधीच पुण्यात काँग्रेसकडून थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा देण्यात आल्या. यावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसकडून देण्यात आलेल्या या घोषणाबाजीवर आता महाविकासआघाडीमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेची काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून पालिकेने गणेश मूर्ती विक्रेते अन् मंडळांना धाडल्या नोटीसा; वाचा कारण काय?
-महायुतीत वडगाव शेरीवरुन खडाजंगी; भाजप-राष्ट्रवादीचा वाद शिगेला, नेमकं कारण काय?
-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेकडून रस्तांची मलमपट्टी; ९ दिवसांत किती खड्डे बुडवले?