पुणे : येत्या ४ दिवसांवर गणेशोत्सव सुरु होत आहे. या पार्शभूमीवर पुण्यात गणेशोत्सवाची जोमाने तयारी सुरु आहे. सध्या शहरामध्ये सर्वत्र गणेश मूर्तींचे स्टॉल, गणेश मंडळांकडून गणपतीचे मंडप टाकल्याचे दिसत आहेत. यासाठी देखील काही नियमावली आहेत. त्यातच अनेक मंडळाकडून आणि मूर्ती विक्रित्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने पुणे पालिकेने शहरातील २९९ विक्रेत्यांना नोटीस पाठवली आहे.
महापालिकेची परवानगी न घेता रस्त्यावरच गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल टाकणाऱ्या शहरातील २२९ विक्रेत्यांना पालिकेने नोटीस दिली आहे. ठरवून दिलेल्या मान्यतेपेक्षा अधिक आकाराचे मंडप टाकल्याने पालिकेने ३ मंडळांना देखील नोटीस बजावली आहे. शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील ही सार्वजनिक गणेश मंडळे आहेत.
पादचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, फूटपाथ अडवून स्टॉल टाकू नये, अशा सूचना पालिकेने दिल्या असताना देखील अनेक गणेश मूर्ती विक्रेत्यांनी अनेक भागात पादचाऱ्यांना चालताना त्रास होईल अशा प्रकारे स्टॉल लावले असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. त्यावरुन याबाबत शहानिशा करुन ही कारवाई करण्यात आली आहे.
पादचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच पदपथ अडवून स्टॉल टाकू नये, अशा सूचना पालिकेने केल्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष करत शहरातील विविध भागात नागरिकांना चालण्यासाठी त्रास होईल, अशा पद्धतीने गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल लावण्यात आल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. याची शहानिशा करण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार पालिकेकडे आलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याने पालिकेने या विक्रेत्यांना नोटीस बजाविली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महायुतीत वडगाव शेरीवरुन खडाजंगी; भाजप-राष्ट्रवादीचा वाद शिगेला, नेमकं कारण काय?
-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेकडून रस्तांची मलमपट्टी; ९ दिवसांत किती खड्डे बुडवले?
-पर्वतीत आबा बागुलांनी ठोकला शड्डू, कार्यकर्तेही लागले कामाला; बॅनर्स झळकवत….