अहमदनगर | पुणे : राज्यात एकीकडे विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे तर दुसरीकडे राज्यातील गुन्हेगारी संपताना दिसत नाही. पुणे शहरामध्ये खून, बलात्कार, विनयभंग, हत्या, असे प्रकार दिवसेंदिवस धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या दोन्ही मुलांनी आत्महत्या केल्याच्या दु:खातून संगमनेरमधील वाडेकर दाम्पत्याने आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
२ वर्षापूर्वी वाडेकर दाम्पत्याच्या १६ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली होती. त्या मुलाच्या जाण्याने वाडेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर या दु:खातून सावरतो तोच ८ दिवसापूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाने (२१ वर्ष) मुलाने पुण्यात गळफास लावून आत्महत्या केली. गणेश मछिंद्र वाडेकर आणि गौरी गणेश वाडेकर यांनी दोन्ही मुलांच्या आत्महत्येच्या नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचा अंदाज स्थानिकांचे तसेच संगमनेर शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वाडेकर दाम्पत्याने राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांना २ चिठ्ठ्या सापडल्या आहेत. त्यापैकी एका चिठ्ठीमध्ये वाडेकरांनी वाकड पोलिसांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. वाडेकर दाम्पत्याचा २१ वर्षीय मुलगा श्रीराजचा पुण्यात मृत्यू झाला होता. त्यावरुन वाडेकरांनी वाकड पोलिसांविषयी नाराजीचा काही मजकूर लिहला असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पर्वतीत आबा बागुलांनी ठोकला शड्डू, कार्यकर्तेही लागले कामाला; बॅनर्स झळकवत….
-भक्तांच्या ‘त्या’ मागणीचा ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ने राखला मान, काय होती मागणी?
-अमोल कोल्हेंनी लोकसभेत केली बिबट्याच्या नसबंदीची मागणी; मनेका गांधी म्हणाल्या, ‘त्यापेक्षा..’
-‘देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, पण…’; जरांगे पाटलांचं वक्तव्य