पुणे : गेल्या काही वर्षांपासून जंगली प्राण्यांची मानवी वस्तींमध्ये धुसण्याची आणि माणसांवर हल्ले करण्याची प्रकरणे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे वाढत्या नागरीकरणामुळे मानवाने वन्य प्राण्यांच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. तसेच जुन्नर परिसरामध्ये बिबट्यांचा मानवांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.
या बिबट्यांवर उपाययोजना म्हणून ‘उप वनविभागातील ११ नर आणि ३६ मादी बिबट्यांवर गर्भनिरोधक उपाययोजना सुरू कराव्या’, असा शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रस्ताव संसदेत मांडला. अमोल कोल्हे यांनी मांडलेल्या या प्रस्तावावर माजी केंद्रीय मंत्री आणि प्राणी हक्क संरक्षणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या मनेका गांधी यांनी टीका केली आहे.
प्रदीर्घ लढा यशाच्या दिशेने!
शिरूर लोकसभा मतदारसंघातील मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी अंतिम उपाय म्हणून बिबट प्रजनन नियंत्रण करावे अशी आग्रही मागणी मी अनेकदा संसदेत केली. केंद्रीय वनमंत्री, केंद्रीय वनविभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन अशा अनेक स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करून… pic.twitter.com/qJQeZkEEQE
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 2, 2024
काय म्हणाल्या मनेका गांधी?
“बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रणासाठी त्यांच्यावर गर्भनिरोधक उपाय करणे, हा नक्कीच व्यवहार्य उपाय नाही आणि या प्रस्तावामागे कोणताही अभ्यास अथवा शास्त्रीय आधार नाही. यामुळे पर्यावरण संतुलन बिघडून अनर्थ घडेल. बिबट्या नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी संबंधित खासदारांनी रानडुक्कर, ससे आदी बिबट्यांच्या नैसर्गिक भक्ष्यांची अवैध शिकार थांबविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या-
-‘देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत, पण…’; जरांगे पाटलांचं वक्तव्य
-खडकवासल्यावर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा; भीमराव तापकीरांची डोकेदुखी वाढली!
-सुप्रिया सुळे म्हणाल्या ‘दूधवाला पण लवकर उठतो’, अजितदादांचं सणसणीत उत्तर; म्हणाले…
-‘…आता ‘ते’ तुमच्या हातात’; विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजितदादांची बारामतीकरांना भावनिक साद