पुणे : पुण्यातील ‘पोलिसनामा’ या न्यूज पोर्टलचे वरिष्ठ पत्रकार प्रसाद गजानन गोसावी यांचे रविवारी १ सप्टेंबर रोजी निधन झाले. एका गंभीर अपघातामुळे गोसावींवर निगडीच्या खासगी रुग्णालयामध्ये गेल्या पावणे २ महिन्यापासून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान प्रसाद गोसावी यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूनंतर प्रसाद यांचे अवयव दान करण्यात आले. या स्तुत्य निर्णयामुळे प्रसाद हे अवयव दान करणारे पहिले पत्रकार ठरले आहेत.
प्रसाद गोसावी आज या जगात नसले तरीही त्यांचे हृदय एका लष्करी जवानाच्या शरीरामध्ये धडधडत आहे. लष्करी जवानाच्या शरिरामध्ये प्रसादचे हृदय यशस्वीपणे प्रत्यारोपन करण्यात आले आहे. प्रसाद यांच्या हृदयाबरोबरच २ फुफ्फुसे, यकृत, एक मूत्रपिंड आणि दोन डोळे या अवयवांचे देखील दान करण्यात आले. त्यामुळे प्रसाद यांच्यामुळे एकूण पाच रुग्णांना नवीन जीवन मिळाले आहे.
प्रसाद गोसावी यांचा खडकी रेल्वे स्टेशनजवळ मोठा अपघात झाला होता. त्यावेळी त्यांना निगडीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच ब्रेन डेड झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या या कुटुंबियांनी या दु:खात असताना देखील त्यांच्या अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. प्रसादचे हृदय ग्रीन कॉरिडॉरने पिंपरीपासून पुण्यापर्यंत पोलीस आणि लष्करी जवानांच्या संरक्षणात आणले. त्यावेळी डी. वाय. पाटील रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी प्रसादला सलामी दिली.
महत्वाच्या बातम्या-
-खडकवासल्यावर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा; भीमराव तापकीरांची डोकेदुखी वाढली!
-सुप्रिया सुळे म्हणाल्या ‘दूधवाला पण लवकर उठतो’, अजितदादांचं सणसणीत उत्तर; म्हणाले…
-‘…आता ‘ते’ तुमच्या हातात’; विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजितदादांची बारामतीकरांना भावनिक साद
-शहराच्या मध्यवर्ती भागात मोठा दबदबा अन् नावाची दहशत; आंदेकरांचा इतिहास काय?